Headlines
Home » शैक्षणिक » केसीई अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात विद्यार्थी झाले प्राचार्य, प्राध्यापक

केसीई अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात विद्यार्थी झाले प्राचार्य, प्राध्यापक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्राचार्य, प्राध्यापक आदी भूमिका साकारत विद्यार्थ्यांना शिकवले. शिक्षण तज्ज्ञ, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी केले. त्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्वही विशद केले. अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

या वर्षी महाविद्यालयात ‘फ्लिप द स्क्रिप्ट’ या अंतर्गत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे कामकाज पाहिले. विद्यार्थ्यांनी प्राचार्यापासून ते ग्रंथपालपर्यंत सर्व भूमिका साकारल्या. विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाच्या भूमिकेत वर्गात जाऊन उपस्थित विद्यार्थ्यांना शिकविले. यात महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून मयूर व्यास, उपप्राचार्य निखिल पाटील, अकॅडमिक डीन जान्हवी दैवज्ञ, रजिस्ट्रार कृष्ण पाटील, संगणक विभाग प्रमुख श्वेता चौधरी, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख मयूर फुलपगार, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभाग प्रमुख साक्षी करोले, डेटा सायन्स विभाग प्रमुख दीपाली श्रीवास्तव, मेकॅनिकल विभाग प्रमुख लोकेश खडके, प्रथम वर्ष विभाग प्रमुख शुभम शिंदे, व्यवस्थापन विभाग प्रमुख मनीषा बारी, ग्रंथपाल मयूर पाटील, शारीरिक निर्देशक पियुष चौधरी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख जय सरोदे या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे अतिशय आनंदाने आणि उत्साहाने कामकाज पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!