कजगाव | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) भडगाव तालुक्यातील कजगाव येथे शारदा माध्यमिक विद्यामंदिर व बबनबाई हिरण माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय चीला पाटील व अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बी.के पाटील उपस्थित होते. तब्बल वीस वर्षानंतर म्हणजेच शैक्षणिक वर्ष २००३/०४ इयत्ता दहावी चे सर्व विद्यार्थी या स्नेहसंमेलनानिमित्त एकत्र जमले.
सदर कार्यक्रमासाठी ४५ माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शाळेचे आजी-माजी शिक्षक या प्रसंगी हजर होते. यावेळी प्रथम सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला व जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मयत झाले आहेत त्यांना सर्व शिक्षक व माजी विद्यार्थी मित्र परिवारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले आणि सुख दुःखाचे प्रसंग सांगीतले. बालपणीच्या आठवणी व्यक्त करण्यात आल्या. काही विद्यार्थ्यांना याप्रसंगी आठवणींना उजाळा देतांना गहिवरून आले.
या कार्यक्रमाचे आयोजन दिनेश धाडीवाल, राहुल धाडीवाल, भूषण सोनार, वीरेंद्र देवरे, जितेंद्र हिरण यांनी केले. तसेच शाळेतील शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतातून भावी पिढीने व्यावहारिक ज्ञानाकडून अध्यात्मिक ज्ञानाकडे कसे जावे, समाजाप्रती आपले काय योगदान असावे, याविषयी मार्गदर्शन उपस्थितांना केले.
यावेळी कार्यक्रमाला ब.ज. हिरण विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. के पवार, माजी मुख्याध्यापक पी.बी मोरे, बी.जे. पाटील, पी.सी. पाटील, ए.डी. पाटील, एम.जे. पाटील, एस.बी. पवार, एस.एस. केदार, नितीन पाटील, बी.एस. पाटील, के.डी.पवार, एल.जे. सोनवणे मॅडम, डी.पी. पाटील, शाळेचे माजी शिपाई अशोक पाटील, अजब सिंग पाटील, रमेश सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान शैक्षणिक वर्ष २००३-०४ च्या बॅच मधील विद्यार्थिनी आशा पाटील या विद्यार्थिनीचे पती अंकुश पाटील हे शहीद झाले असून त्यांना श्रद्धांजली देऊन वीर पत्नीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मांगीलाल मोरे व नीता गुलेच्या यांनी केले तर आभार विरेंद्र राजपूत यांनी मानले.
