Headlines
Home » सामाजिक » जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे शहर पोलीस स्टेशनमधील कैद्यांसाठी सतरंजी, चादर सुपूर्द

जैन इरिगेशन सिस्टीम लि.तर्फे शहर पोलीस स्टेशनमधील कैद्यांसाठी सतरंजी, चादर सुपूर्द

सतरंजी, चादर सुपूर्द करताना चंद्रकांत जैन, अनिल जोशी, दीपककुमार गुप्ता, पोलिस निरीक्षक अनिल भवारी

जळगाव | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– राम नवमीच्या निमित्ताने जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या लॉकअप मधील कैद्यांना अंथरण्यासाठी सतरंजी व पांघरूण म्हणून सोलापुरी चादर देण्यात आल्या. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता, जैन इरिगेशनचे चंद्रकांत जैन, अनिल जोशी यांच्या हस्ते पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या.

लॉकअप मधील कैद्यांना या वस्तू मिळण्याचे सहकार्य व्हावे अशी अपेक्षा दीपककुमार गुप्ता यांनी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याकडे केली होती. त्यानुसार सदरच्या वस्तू आज शहर पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आल्यात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!