Headlines
Home » जळगाव » छ्त्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त “जय शिवराय-जय भारत” पदयात्रा आयोजन

छ्त्रपती श्री शिवाजी महाराज जयंती निमित्त “जय शिवराय-जय भारत” पदयात्रा आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांचे सूचनेनुसार शिव जयंती निमित्त “जय शिवराय-जय भारत” पदयात्रेचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र जळगाव, मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार) आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून सदर उपक्रमाच्या आयोजनाबाबत आज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे विविध शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य , मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती.

सभेस जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, जळगाव नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांची उपस्थिती होती. यात आयोजनाबाबत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सभेस जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उपशिक्षणाधिकारी फिरोज पठाण, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर यांनी मार्गदर्शन केले.

सभेचे सूत्रसंचलन राजेश जाधव यांनी तर आभारप्रदर्शन क्रीडा अधिकारी सचिन निकम यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!