जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आंतर जिल्हा २३ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दि. ०१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०८:३० वाजता अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी शाळेच्या मैदानावर शिरसोली रोड जैन हिल्स जळगांव येथे आयोजित करण्यात आली आहे.
ज्या मुलांचा जन्म दि.१ सप्टेंबर २००२ रोजी वा त्या नंतरचा असेल तेच मुले या निवड चाचणीसाठी पात्र असतील. सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने https://forms.gle/15fDC18m9vwACDjR9 या लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्म व ऑनलाईन निवड चाचणी फी १०० रु. भरून आपला सहभाग नोंदवावा. सोबत आपले आधार कार्ड व जन्म दाखला अपलोड करावा. तसेच निवड चाचणीसाठी क्रिकेट साहित्य, पांढरा गणवेश व शूज ओरिजनल जन्म दाखला / आधार कार्ड सोबत आणावे. असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन यांनी केली आहे.
अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे ( ९४०४९५५२०५ ) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३ ) यांचेशी संपर्क साधावा.