Headlines
Home » आंतरराष्ट्रीय » भारताचा ‘गोल्डन बॉय नीरज’ फायनलमध्ये ; सुवर्ण पदकासाठी पाकिस्तानच्या खेळाडूसोबत भिडनार

भारताचा ‘गोल्डन बॉय नीरज’ फायनलमध्ये ; सुवर्ण पदकासाठी पाकिस्तानच्या खेळाडूसोबत भिडनार

Paris Olympics 2024 : भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ८९.३४ मीटर भालाफेक करून पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे नीरजच्या सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा वाढल्या आहेत.

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पुरुष भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नीरजने ब गटातून पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकून फायनलचे तिकिट मिळवले. दरम्यान, थेट फायनलचे तिकिट मिळवण्यासाठी ८४ मिटर लांब भाला फेकणे, गरजेचे होते. नीरजसह पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही ८६.५९ मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फायनलमध्ये, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीम सोबत भिडणार आहे.

या हंगामात नीरज चोप्राचा सर्वोत्तम थ्रो ८८.३६ मीटर होता, ऑलिम्पिक मध्ये मात्र नीरज ने थ्रो मध्ये सुधारणा केली आहे. पात्रता फेरीत नीरज चोप्रा आघाडीवर राहिला. त्याने ८९.३४ मीटर अंतर कापून प्रथम स्थान मिळविले. नीरज चोप्रा आता सुवर्णपदकासाठी ८ ऑगस्टला होणाऱ्या अंतिम फेरीत ॲक्शनमध्ये दिसणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!