Headlines
Home » जळगाव » कजगावात डी.पी.चे फाटक उघड्यावर , महावितरणाचे अधिकारी मात्र वाऱ्यावर

कजगावात डी.पी.चे फाटक उघड्यावर , महावितरणाचे अधिकारी मात्र वाऱ्यावर

कजगाव | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दीपक अमृतकर ; कजगाव येथे रस्त्याच्या कडेला वीजमंडळाच्या खांबावर उघड्या असलेल्या धोकेदायक ट्रान्सफॉर्मरला फाटक बसविण्यासाठी नागरिकांनी विजमंडळाकडे वारंवार मागणी केली होती. तसेच सदर बाब प्रसिद्धीमाध्यमांद्वारे सर्वांच्या निदर्शनास आणून दिली होती. याची दखल घेत सदर पोलवरील उघड्या ट्रांसफार्मरला फाटक बसवण्यात आले.

दरम्यान आठ दिवसात हे ट्रांसफार्मर पुन्हा उघडे झाले आहेत. फाटक तर बसवले, पण आता ते झाकणार कोण ? हा प्रश्न नागरिकांमध्ये मोठा चर्चेचा विषय बनला आहे. हा ट्रांसफार्मर भर रस्त्यावरील पोलवर असुन तिथे आजूबाजूला रहिवासही आहे. दुर्दैवाने काही बरेवाईट झाले तर त्यास जबाबदार कोण असणार .
कर्मचारी मात्र फक्त कारवाई करण्यात व्यस्त-
महावितरणचे कर्मचारी हे फक्त गावातील वीज चोरी तसेच व्यापारी संकुल, घरगुती मीटर यांच्यावर कारवाई करण्यात व्यस्त असल्याने फाटक लावण्याचा विसर पडतो का ? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!