Home » जळगाव » माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील याच्या कार्याचा सन्मान

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील याच्या कार्याचा सन्मान

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जालना येथील हाॅटेल सागर इन कलावती येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या राज्य स्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी राज्यभरातून माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे सर्व पदाधिकारी समितीचे सदस्य आले होते. समाधान पाटील या पत्रकाराने गेल्या तीन वर्षांपासून समितीचे काम फार मेहनतीने केलेले आहे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे कार्य जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पोहचविले आहे. त्यांनी आपल्या सोबत जळगाव जिल्ह्यातील व धुळे जिल्ह्यातील सदस्य जमवून उत्तर महाराष्ट्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे मोठे संघटक उभे केले.

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून अन्याय झालेला व्यक्तिंना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्न करत असतात या सर्व बाबींचा विचार करून माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर, महाराष्ट्र राज्य समितीचे सचिव विनोद गायकवाड, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सखाराम कुलकर्णी, मराठवाडा विभागीय अध्यक्ष जगन्नाथ रासवे यांनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक समाधान पाटील यांना सन्मान पत्र, शाल, पुष्पगुच्छ,व ट्रॉफी देउन सन्मानित केले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!