Headlines
Home » क्राईम » हृदयद्रावक : आई-वडीलांसमोरच टँकरखाली चिरडल्याने बालकाचा मृत्यू !

हृदयद्रावक : आई-वडीलांसमोरच टँकरखाली चिरडल्याने बालकाचा मृत्यू !

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्यावरील अपघातात एका टँकरखाली येऊन १५ वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. राजवीर नरेंद्र भोसले (वय १५ रा. आमडदे ता. भडगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. त्याचे वडील नरेंद्र भोसले हे आमडदे गावात राहतात. नरेंद्र भोसले यांचा वैद्यकीय व्यवसाय असुन ते दि.१७ जून रोजी पाचोरा येथे पत्नी, मुलगा राजवीर आणि मुलगी यांच्यासह काही कामानिमित्त आलेले होते. काम आटोपुन त्याच दिवशी रात्री दहा वाजेनंतर घरी आमडदे येथे परत जात असतांना रस्त्यात बांबरुड फाट्याजवळ पावसामुळे त्यांचे दुचाकी वाहन घसरुन अपघात झाला.

दरम्यान वाहन घसरल्याने दुचाकीवरून सर्व खाली पडले. त्यात राजवीर हा जवळून जाणाऱ्या टँकरखाली येऊन चिरडून ठार झाला. डोळ्यादेखतच मुलाचा मृत्यू झाल्यामुळे भोसले परिवाराला मोठा धक्का बसला आहे. अपघतात स्थळावरुन राजवीर आणि जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे राजवीर याला डॉक्टरांनी मयत घोषित केले. तर नरेंद्र भोसले, त्यांच्या पत्नी व मुलीला किरकोळ खरचटल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

सदर अपघाताबद्दल पाचोरा पोलीस स्टेशन येथे मंगळवारी दि. १८ जून रोजी पहाटे ७ वाजेपर्यंत काहीही दाखल नव्हते. या भीषण अपघातामुळे रस्त्यांच्या दुर्दशेचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. अपघातग्रस्त टँकर हे पाचोरा पोलीस स्टेशन येथे जमा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!