Home » जळगाव » प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या वाढदिवसा निमित्त ऐनपूर आरोग्य केंद्रात फळ वाटप

प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या वाढदिवसा निमित्त ऐनपूर आरोग्य केंद्रात फळ वाटप

रावेर ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र ऐनपूर येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांचा काल दि.३० रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आज दि.३१ऑक्टोबर रोजी जिल्हा (ग्रामिण) अध्यक्ष संतोष नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऐनपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ आणि बिस्कीट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी संघटनेचे जिल्हा सचिव इकबाल पिंजारी, तालुका कार्याध्यक्ष विजय एस.अवसरमल, तालुका संघटक विजय के.अवसरमल, तालुका प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र इंगळे, ज्ञानेश्वर महाजन, अनिल आसेकर, जितेंद्र कोळी, सदस्य तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण परदेशी व रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!