Headlines
Home » शैक्षणिक » मित्र मैत्रिणींनी एकमेकाला दिली साथ ; म्हणूनच आज २७ वर्षानंतर झाली सर्वांची भेट एकसाथ !

मित्र मैत्रिणींनी एकमेकाला दिली साथ ; म्हणूनच आज २७ वर्षानंतर झाली सर्वांची भेट एकसाथ !

GET-TOGETHER : व्हाट्सअप गृपच्या माध्यमातून संपर्क साधून श्री गो से हायस्कूल पाचोरा, या शाळेतील १९९६-९७ मधील दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून “दोस्त माझे मस्त” स्नेह मेळाव्याचे आयोजन.

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल च्या सन १९९६-९७ या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा “दोस्त माझे मस्त” हा स्नेह मेळावा दैवयोग मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. या स्नेह मेळाव्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, तारापूर, नागपूर, जळगाव, चाळीसगाव, धुळे, नंदुरबार, पाचोरा येथील ९० माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला. २७ वर्षांनी एकत्र आल्यानंतर त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

शहरातील किरण शिंपी, दत्ता सोनार, गोकुळ सोनार यांनी १६० माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून या ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांनी “दोस्त माझे मस्त” या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले. सकाळी साडेनऊ वाजता चहापान नाश्ता केल्यानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना शिकवत असलेल्या सर्व सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री गो से हायस्कूल पाचोरा या शाळेला भेट दिली.

शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर.एल. पाटील एबी. अहिरे यांनी सेवानिवृत्त शिक्षक बंधू-भगिनीं तसेच सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तेथे माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपण कोणत्या वर्गात शिकत होतो, आपल्या अभ्यासाचे आणि खेळण्याचे ठिकाण, खोड्या कशा करत होतो कुठे गप्पा मारत होतो, कोणत्या बेंचवर कोण बसतं होते अशा मागील सर्व आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाची सुरुवात अपेक्षा पवार यांनी ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या स्वागत गीताने केली. कोरोना काळात मयत झालेले सहकारी मित्र त्यांना शिकवत असलेले शिक्षक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर त्यांना शिकवत असलेल्या सर्व सेवानिवृत्त शिक्षक बंधू-भगिनींचा १९९७ च्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शाल श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत केले. सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला परिचय करून दिला आणि त्यांनी शिक्षकांच्या प्रति आदरयुक्त भावना व्यक्त केल्या. शिक्षक बंधू-भगिनींनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, सुधा जोशी, गणपत वाणी, शांताराम चौधरी, भास्कर बोरुडे, राजेंद्र पाटील, ए.जे. महाजन, बी.पी. बडगे, प्रताप सूर्यवंशी, बी.पी. वाणी, अजय अहिरे, विश्वास साळुंखे, सुधीर पाटील उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

स्नेह मेळाव्यासाठी अमोल ठाकूर, दत्ता सोनार, गोकुळ सोनार, अभिलाष बोरकर, नितीन पाटील, विनोद मार्तंडे, दीपक माने, हेमंत सोनार, जितेंद्र भावसार, शरद मिस्त्री, सचिन कानडे, ललित बडगे, संदीप सिसोदिया, महेश सोमवंशी, अमित पाटील, अपेक्षा पवार, पल्लवी देशपांडे, कांचन तांबोळी, सुवर्णा चौधरी, जयश्री ठाकूर, सुजाता सुरडकर, किरण सोनार, वैभव जोशी, समाधान जोशी, बापू पाटील, आत्माराम महाजन, अल्पेश कुमावत, किरण कुमावत, बापू पाटील, प्रवीण चौधरी, गोपाल पाटील, वाजित बागवान, तुषार बिऱ्हाडे, अजय सिनकर, राजेंद्र पाटील, वरुण शर्मा उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोकुळ सोनार सूत्रसंचालन माधुरी ठाकूर तर आभार अभिलाष बोरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी १९९७ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!