Headlines
Home » राजकीय » महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे अशोक चव्हाण यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कॉंग्रेसचे अशोक चव्हाण यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा

मुंबई दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – “आज सोमवार, दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे”, असे अशोक चव्हाण यांनी एक्स या सोशल मिडिया अकॉउंटवर पोस्ट करून माहीती दिली .

सविस्तर वृत्त असे की आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांचा राजीनामा हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी धक्का मानला जातो आहे. आता अशोक चव्हाण भाजपात जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसकडून नाना पटोलेंनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं की आहे, काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्दैवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू ,असं म्हणत नाना पटोले म्हटले .

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. अशातच आता चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे चव्हाण आता भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याविषयी बोलताना राज्यातील भाजपाचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसचे अनेक लोकनेते आगामी काळात भाजपात येतील.

फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की काँग्रेसमधील अनेक चांगले नेते हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्याप्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे. त्यातून जनतेशी घट्ट जोडलेल्या नेत्यांची सध्या घुसमट होतेय. त्यामुळे देशभरातील काँग्रेसचे लोकनेते भाजपात प्रवेश करत आहेत. काही मोठे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मी आता एवढंच म्हणेन, आगे आगे देखिये होता है क्या ।

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!