Headlines
Home » जळगाव » दोन सुवर्ण पदकं व प्रशस्तीपत्र देऊन शेतकरी कन्येचा राज्यपालांच्या हस्ते गौरव !

दोन सुवर्ण पदकं व प्रशस्तीपत्र देऊन शेतकरी कन्येचा राज्यपालांच्या हस्ते गौरव !

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : मनी जिद्द असली म्हणजे ठरविलेल्या ध्येया पर्यंत पोहचणे शक्य असते, शिक्षणाची जिद्द मनी घेत कजगाव येथील एका शेतकऱ्याच्या कन्येने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत दोन सुवर्णपदक पटकावणाऱ्या ऋतुजा चौधरी या शेतकरी कन्येस राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

भडगाव तालुक्यातील कजगाव येथील शेतकरी भिमराव अर्जुन चौधरी यांची कन्या ऋतुजा हिने एम.एस्सी. वनस्पतीशास्त्र या विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे नुकत्याच झालेल्या दीक्षांत समारंभात ऋतुजा हिस राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे हस्ते दोन सुवर्ण पदकं आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ऋतुजा हिस सुरुवाती पासूनच शिक्षणाची आवड असल्याने शिक्षणात नाव कमवायचे हेच ध्येय मनी घेत कजगाव येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर चाळीसगाव व धुळे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. तसेच धुळे येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयात एम.एस्सी. वनस्पतीशास्त्र हा अभ्यासक्रम पूर्ण केला.

दोन महिन्यापूर्वी विवाहबद्ध झालेल्या ऋतुजाच्या या घवघवीत यशाने सासरी म्हणजेच कळमसरे तसेच माहेर कजगाव येथे या शेतकरी कन्येने मानाचा तुरा रोवल्याने दोन्ही गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!