जळगाव | दि. २६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मानव सेवा माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. आर. एस डाकलियाजी अध्यक्ष स्थानी होते. त्याचप्रमाणे संस्थेचे मानद सचिव मा. विश्वनाथ जोशीजी, माध्यमिक मुख्याध्यापिका मा. सौ.प्रतिभा सूर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका मा.सौ. माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मा. सौ. मुक्ता पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर नयन बोरसे, नेहा लिंडाईत, पुष्कर सपकाळे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या व शाळेच्या बाबतीत मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी बालवाडी मुख्याध्यापिका सौ. मुक्ता पाटील ,माध्यमिक मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना गोष्टी सांगून दहावी नंतर करिअर विषयी मार्गदर्शन केले तसेच परीक्षा काळात घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेचे सचिव श्री.जोशीजी यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियान बाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. डाकलियाजी यांनी देखील विद्यार्थ्यांना दहावीनंतर विविध अभ्यासक्रम , विविध क्षेत्र याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. गिरीष जाधव यांनी मानलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
