Home » क्राईम » एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी छापा ; आयकर विभागाकडून झाडाझडती

एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी छापा ; आयकर विभागाकडून झाडाझडती

मुंबई दि. ०८ ( वास्तव पोस्ट न्यूज़ ) – मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची बातमी समोर आली आहे. आयकर विभागाने त्यांच्या घरी आज छापा टाकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सेवेत असतांना त्यांची एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख बनलेली होती. एका माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाकडून या प्रकरणात काही ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे. प्रदीप शर्मा हे वर्षभरापासून अधिक काळ जेलमध्ये होते. ते मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आहेत . नुकताच त्यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर झाला होता.
छापेमारीचं नेमकं कारण काय ?
दुसऱ्या एका प्रकरणाच्या तपासात प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाची टीम दाखल झाली असुन हे प्रकरण थेट प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित नाही. परंतु त्या प्रकरणाचा प्रदीप शर्मा यांच्याशी काही संबंध आहेत का ? या अनुषंगाने सगळ्या मालमत्तेची पडताळणी केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!