जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये व्यसनमुक्ती उपक्रम राबवण्यात आला. यात विद्यार्थ्यांसह सर्वांना व्यसन मुक्तीपर शपथ देण्यात आली.
व्यसनांमुळे मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हृदयरोगामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये २५ टक्के लोक धूम्रपान करणारे असतात. कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये ३० टक्के हिस्सा धूम्रपानाचा आहे. धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे आजार होण्याचे प्रमाण ७५ टक्के आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थी सुद्धा अंमली पदार्थ सेवनाच्या गर्तेत सापडलेले दिसतात. सर्वांनी व्यसनांपासून दूर रहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ.संजय सुगंधी यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाने सर्वांना व्यसनांपासून दूर राहण्याची सामूहिक शपथ देण्यात आली. यावेळी अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, प्रा.दर्शन ठाकूर, प्रा. के.बी.पाटील, प्रा. मुकेश तिवारी, प्रा. राहुल पटेल आदी उपस्थित होते.