Headlines
Home » जळगाव » डॉ. विजेता सिंग यांचा चेन्नई येथील राष्ट्रीय परिषदेत सहभाग

डॉ. विजेता सिंग यांचा चेन्नई येथील राष्ट्रीय परिषदेत सहभाग

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : चेन्नई येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेमध्ये येथील एस.एस. मणियार लॉ कॉलेजमधील प्रा.डॉ. विजेता सिंग यांनी सहभाग घेतला. या परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या खान्देशातील त्या एकमेव प्राध्यापिका होत्या. चेन्नई येथील स्कूल ऑफ लॉ, वेल टेक रंगराजन डॉ. सगुंथला आर. अँण्ड डी. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीतर्फे ही परिषद घेण्यात आली.

या परिषदेमध्ये महाराष्ट्रातून केवळ दोनच प्राध्यापिका सहभागी झाल्या होत्या. एस.एस. मणियार लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. युवा कुमार रेड्डी, प्रा.डॉ.क्षीरसागर यांचे डॉ. विजेता सिंग यांना मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा.डॉ.अंजली बोंदर, प्रा.स्वाती लोखंडे, प्रा.बी.एस.पाटील, प्रा.रेखा पहुजा, प्रा.शरद चव्हाण, प्रा.डॉ. ज्योती भोळे यांनी डॉ. विजेता सिंह यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!