Home » जळगाव » राज्य कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात

राज्य कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे १६ वर्ष वयोगटातील ३५ व्या राज्यस्तरीय किशोर किशोरी कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. किशोर गटाची स्पर्धा स्व.ॲड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालयाच्या मैदानावर तर किशोरी गटाची स्पर्धा आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आली.

किशोर गटात २८ तर किशोरी गटात १२ संघ, असे एकूण ४० संघ सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण समारंभ राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटीचे संचालक पांडुरंग खडके, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अरुण गावंडे यांचे हस्ते करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव नगरसेवक नितीन बर्डे, विभागीय क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्ष प्रशांत कोल्हे, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष इकबाल मिर्झा, कबड्डी असोसिएशनचे पंच प्रमुख सुनिल राणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हरीश शेळके यांनी केले.

विजय संघ पुढीलप्रमाणे

किशोर गट :
१) स्वामी स्पोर्ट्स, रावेर
२) कैलास क्रीडा मंडळ, जळगाव
३) फ्रेंड्स क्लब, मारवड

किशोरी गट :
१) शिवा स्पोर्ट्स संघ, वाघोदा
२) सरदारजी जी जी स्पोर्ट्स संघ, रावेर
३) क्रीडा रसिक संघ, जळगाव

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!