जळगाव, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )- ॲथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित आंतर जिल्हा राष्ट्रीय अथेलेटिक्स स्पर्धांचे दि १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान अहमदाबाद गुजरात येथे आयोजन केले आहे.
स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे सात खेळाडू सहभागी होत असून निवड झालेला संघ स्पर्धेसाठी रवाना झाला. सर्व खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, संघटना यांना जिल्हा प्रशासनाकडून मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या .
