Headlines
Home » क्रीडा » १४ जुलै रोजी कॅडेट व ज्युनियर मुलं व मुली जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धा

१४ जुलै रोजी कॅडेट व ज्युनियर मुलं व मुली जिल्हास्तरीय तायक्वांडो स्पर्धा

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ जुलै रोजी अनूभुती इंटरनॅशनल निवासी स्कूल, शिरसोली रोड जळगांव येथे कॅडेट व ज्युनियर मुलं व मुली यांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेतील कॅडेट व ज्युनियर मुलं व मुली मिळुन ४० विविध वजनी गटात या स्पर्धा पार पडणार आहेत. यातील प्रथम विजेते खेळाडू याच महिन्यात चंद्रपुर व बिड येथे होणार असलेल्या राज्य स्पर्धेत सहभागी होतील.

तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल भाऊ जैन, सचिव अजित घारगे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
अधिक माहितीसाठी कांताई सभागृह, बस स्टॅण्ड घ्या पाठीमागे येथे अजित घारगे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!