पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने पाचोरा शहरातील मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सर्व सदस्यांना जागतिक योगा दिनानिमित्त ‘योगा मॅट’चे वाटप करण्यात आले. यावेळी सदस्य बाळू पाटील, सचिन सुर्यवंशी, विजय येवले, सी.एन. चौधरी, शशिकांत पाटील, भरत गायकवाड, किशोर पाटील, छोटू बडगुजर, संजय पाटील, बाळू बडगुजर, भगवान बडगुजर, चंद्रकांत शेलार, नितीन मोराणकर, किरण महाजन, अशोक पाटील, अशोक बागड, रमेश वाणी, भास्कर पाटील, मनोहर काटे, गोपाल पाटील, डी. पी. वाणी, मंगलसिंग राजपूत, वरुण जाधव, प्रवीण महाराज, संजय निंबाळकर यांना वाटप करून सदस्यांसोबत योगा करून चहा-पाण्याचा स्वाद घेत, विविध विषयांवर मनसोक्त चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाला वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह पक्षाचे पाचोरा शहर प्रमुख अनिल सावंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदीप जैन, शहर प्रमुख मनोज चौधरी, संजय चौधरी, अभिषेक खंडेलवाल, जयश्री येवले, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला संघटक उपस्थित होते.
