जळगाव ( वास्ताव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा विद्यालयात आज आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर एस डाकलियाजी, सदस्य देवेंद्र अग्रवाल, सदस्य डॉ.कोमलकुमार डाकलियाजी, डॉ. सपना डाकलियाजी, तुळशीदास पंडीत सुर्यवंशी व माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा तुळशीदास सुर्यवंशी, परिसरातील नागरिक शालिग्राम यादव सोनवणे व विमलबाई शालिग्राम सोनवणे व पालक सदस्य ज्ञानदेव तुळशीराम नन्नवरे व प्रतिभा ज्ञानदेव नन्नवरे, तसेच प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील या मान्यवरांच्या शुभहस्ते विठ्ठल रुख्मिणी व पालखी यांचे पूजन करुन आरती म्हणण्यात आली.
विठ्ठल इयत्ता दहावीतील निलम जितेंद्र जाधव हिने तर रुख्मिणी इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी विद्या प्रमोद निकुम यांनी वेशभुषा केलेली होती. तसेच विविध संतांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली होती.
दरम्यान वारकरी वेशात आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी विठ्ठल गीतांवर पावली खेळले. त्यानंतर टिळक नगर येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात टाळ, मृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. दिंडीच्या आयोजनासाठी यावेळी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.