Home » सामाजिक » साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या लहुजी क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाची राज्यपालांकडे मागणी.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या लहुजी क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाची राज्यपालांकडे मागणी.

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकनायक, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपला देह शोषित, श्रमिक, कामगार आणि वंचितांसाठी आयुष्यभर झिजवला. त्यांचे साहित्य २७ भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. अशा महामानवाला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी निवासी उप जिल्हाधिकारी जळगाव यांना अनिल नामदेव साठे लहुजी क्रांती मोर्चा व ॲड.आनंद कोचुरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

यावेळी सुमित्र अहिरे राज्य सहसंयोजक बहुजन क्रांती मोर्चा, विश्वासराव पाटील राष्ट्रीय किसान मोर्चा, देवा निकम जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, डॉ.शाकीर शेख राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, अकिल कासार जळगाव तालुका अध्यक्ष राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, अविनाश वानखेडे राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा, विजय सुरवाडे जिल्हा महासचिव बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रपाल सुरडकर, सागर भालेराव भारत मुक्ती मोर्चा, रवी मोरे, मधु पवार राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, मुकेश भावसार यांची उपस्थिती होती.

मातंग जातीवर होणारे अन्याय :
महाराष्ट्रातील डॉ.हनुमंत धर्मकारे (यवतमाळ-खुन प्रकरण), प्रसाद खैरनार (येवला-खुन प्रकरण), सोनाजी टोम्पे (हिंगोली-खुन प्रकरण), सुनिल कांबळे (सोलापूर -खुन प्रकरण), अश्विन बोदडे (बोदवड, जळगाव प्रकरण), महादेव रणदिवे (सोलापुर), गुलाब ताकतोडे (नागपुर) अशा अनेक प्रकरणांमध्ये योग्य तपास करुन, योग्य गुन्हे दाखल करुन, संबंधितांना अटक करुन पिडीत कुटुंबियांना न्याय न दिल्यास संपुर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देवानंद निकम जळगाव जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा यांनी दिला.

लहुजी क्रांती मोर्चाच्या मागण्या :

  • १) १ ऑगस्ट हा मराठी भाषा दिन म्हणुन महाराष्ट्रात साजरा करण्यात यावा.
  • २) १ ऑगस्ट- अण्णाभाऊ साठेंच्या जन्मदिनी महाराष्ट्र शासनाने सुटी जाहीर करावी.
  • ३) महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी २५ कोटीचा निधी जाहीर केला होता.जाहीर केलेल्या निधीची तरतुद करण्यात यावी.
  • ४) चिरागनगर येथील अण्णाभाऊंच्या घराला स्मारकाचा दर्जा देण्यात यावा.
  • ५) क्रांतीवीर फकिरा यांच्या समाधीचा जिर्णोद्धार करावा.
  • ६) अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जदारांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या.

◆ मातंग बांधवांना आवाहन :

ब्राम्हण, ब्राम्हणवाद, आर.एस.एस., बीजेपी, कॉंग्रेस यांनी आमचे हक्क व अधिकार संपविण्यासाठी आम्हाला एकमेकांविरुद्ध उभे केले. बामसेफच्या अथक जागृताने आज बहुजन समाजात जागृती वाढत आहे. महाराष्ट्रातील मातंग बांधवांनी लहुजी क्रांती मोर्चा या संघटनेत सामिल व्हावे असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!