Headlines
Home » क्रीडा » तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी दानिश तडवी आणि दर्शन कानवडे रवाना

तायक्वांडो स्पर्धेच्या पुर्व प्रशिक्षण शिबीरासाठी दानिश तडवी आणि दर्शन कानवडे रवाना

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : देवास, मध्य प्रदेश येथे दि.२० ते दि. २४ डिसेंबर या कालावधीत ६८ व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चे मुलांच्या १९ वर्षे आतील ४५ किलो आतील वजन गटात दानिश रहेमान तडवी सरदार जी.जी. हायस्कूल रावेर तथा ६८ किलो आतील वजन गटात दर्शन कानवडे यांची निवड झाली आहे.

सदर महाराष्ट्र संघाचे स्पर्धा पुर्व प्रशिक्षण दि.१४ ते दि.१८ डिसेंबर रोजी अमरावती जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे. सदर दोन्ही खेळाडूंना एन.आय.एस. प्रशिक्षक जयेश बाविस्कर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, महासचिव अजित घारगे, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य सौरभ चौबे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!