Headlines
Home » क्राईम » ऑनलाईन तलाठी परीक्षेत संगणक हॅक ; संगणकाचा कर्सर लातूर येथून ऑपरेट

ऑनलाईन तलाठी परीक्षेत संगणक हॅक ; संगणकाचा कर्सर लातूर येथून ऑपरेट

धाराशिव, दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज )– तलाठी भरतीच्या ऑनलाईन परीक्षेत चक्क संगणक हॅक करून पेपर दिल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. चौकशीनंतर दोषी आढळून आलेल्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी बुधवारी रात्री उशिरा महसूलचे अधिकारी पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र, रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरूच होती.

सविस्तर वृत्त असे की, १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया पार पडली. ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली होती. या परीक्षेत लातूर येथील एक सेंटर चालकाच्या मदतीने येथील संगणक हॅक करून पेपर सोडविण्यात आला. प्रश्नाच्या योग्य उत्तरासमोर टिक करण्यासाठी वापरला जाणारा कर्सर लातूर येथून ऑपरेट केला जात होता, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाची चौकशी झाली असता, संबंधित दोघा परीक्षार्थीची नावे तसेच संगणक हॅक करण्यामध्ये सहभाग असलेल्यांचाही तपास लागला असुन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठले व घडलेल्या साऱ्या प्रकाराची माहीती समोर आली .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!