पाचोरा | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– निर्मल सीड्स कंपनीच्या वतीने दिवंगत आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ निर्मल जलसेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे.
निर्मल सीड्स कंपनीच्या वतीने सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्मल जलसेवा सुरू करण्यात आली आहे.


याअंतर्गत महाराणा प्रताप चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, जारगाव चौफुली येथे पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. येथील रांजणांमधील शुध्द आणि शीतल जल येथून ये-जा करणार्यांना उपलब्ध करण्यात आले आहे.
आज महाराणा प्रताप यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते या पाणपोईंचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निर्मल परिवारातील मान्यवरांची उपस्थिती होती.
