जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित जळगाव किलबिल बालक मंदिर शाळेमध्ये आज दि १८ मंगळवार रोजी “छत्रपती शिवाजी महाराज जयंती” मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित किलबिल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी सिनियर बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्यात. यात दक्ष साळुंखे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, माँ जिजाऊ- गार्गी इंगळे, मावळ्यांच्या भूमिकेत- रोहित देशमुख, सम्राट सुरळकर, कैवल्य सोनवणे, कार्तिक सपकाळे, ध्रुव शेळके हे विद्द्यार्थी होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नप्रभा नेमाडे यांनी केले, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
