राज्यात एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहिम ; दोषींवर कारवाई होणार : मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई ( वास्तव पोस्ट ) : आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो. मात्र राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने आज एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबविण्यात येऊन १ हजार…