Headlines
Home » जळगाव » मणियार विधी महाविद्यालयात रक्तदान शिबिर यशस्वी

मणियार विधी महाविद्यालयात रक्तदान शिबिर यशस्वी

जळगाव ( जळगाव ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दि.३० रोजी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. युवकुमार रेड्डी आणि रेडिक्रोस सोसायटीचे डॉ. तासखेडकर यांनी केले. यावेळी मंचावर रासेयो समन्वयक प्रा. गणपत धुमाळे, डॉ.डी.आर. क्षीरसागर, डॉ.रेखा पहुजा हे होते.

कार्यक्रमास डॉ. योगेश महाजन, डॉ.विजेता सिंग, डॉ.अंजली बोंदर, प्रा.शरद चव्हाण, प्रा.बी.एस. पाटील, प्रा.नितीन मटकरी, प्रा.स्वाती लोखंडे उपस्थीत होते.

या कार्यक्रमाचा उद्देश ऐच्छिक रक्तदानाच्या उदात्त दृष्टिकोनाला चालना देणे आणि स्थानिक रुग्णालये आणि वैद्यकीय केंद्रांमधील रक्ताची वाढती मागणी पूर्ण करणे हा आहे. शिबिर सकाळी ९ वाजता सुरू झाले विद्यार्थी, प्राध्यापक सदस्य यांचा उत्साहपूर्ण सहभाग होता. या शिबिरासाठी प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी रक्तदाना संदर्भात मार्गदर्शन केले. रेडक्रॉसचे तांत्रिक सहायक दीक्षा, जोशी आणि मंगेश यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक धुमाळे यांनी केले तर सूत्रसंचालन ईशा पिंपळीकर हिने केले. ईश्वर मंडोळे यांनी मान्यवरांचे व स्वयंसेवकांचे सक्रिय सहभागाबद्दल आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!