धरणगाव | दि.१४ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील बोरखेडा येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती जल्लोषात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला बोरखेडा ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण बोरखेडा गावाचे सरपंच डॉक्टर विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य पूजा सत्यजित साळवे, ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकाराच्या घोषणा देत, तेथून वाजत गाजत भिम नगरच्या समाज मंदिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती कट आउटचे लोकार्पण ग्रामपंचायत सदस्य सौ. पूजा सत्यजित साळवे आणि सौ.मोनी प्रशांत पिंपळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उपस्थितांनी बुद्धवंदना,।त्रिसरण, पंचशील ग्रहण करून पेढ्यांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला ॲड. अशोक शिंदे, वसंत साळवे, नाना साळवे, सुपडू साळवे, सुरेश वाल्हे, सुनील वैराळे, कैलास वाल्हे, सागर साळवे, किसन सोनवणे, संजय चौधरी, महेश जाधव, अजय साळवे, विकास साळवे, रामदास वाल्हे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
