नवी दिल्ली,दि.१९ (वास्तव पोस्ट न्यूज )- आयसीआयसीआय या खासगी क्षेत्रातील बँकेच्या राजस्थानमधील शाखेत शाखा व्यवस्थापकाने तब्बल दोन कोटी रुपयांचा गंडा घालून अनेक वर्षांपासून ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड़कीस आले आहे. उदयपूर येथील एका व्यक्तीने शाखा व्यवस्थापकाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्यानंतर घोटाळा उघडकीस आला .
राजस्थान पोलिसांचे एसपी अमित कुमार यांच्या नेतृत्वाखालील तपासात या घोटाळ्याचे सत्य समोर आले. बँक शाखा व्यवस्थापक व टीम आपले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढून बचत, व ठेवी खाते काढण्याच्या नावाने पैशांचा वापर करत होते . परंतू एका व्यक्तीला हा प्रकार जेव्हा समजला तेव्हा तो त्यांना ब्लॅकमेल करू लागला. ब्लॅकमेलरला पैसे देण्यासाठी ग्राहकांच्या खात्यातून अधिक पैसे काढले जाऊ लागले . टार्गेट पूर्ण करण्याचा मॅनेजर आणि त्याच्या टीमवर दबाव असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले . मॅनेजर आणि त्यांची टीम एफडीवर ओव्हरड्राफ्ट करायचे, मग ते पैसे नवीन खाती उघडण्यासाठी वापरायचे. काही दिवसांनी ते बंद झाले, त्यानंतर हे पैसे मूळ खात्यात जमा करण्यात आले. असा गैरव्यवहार अनेक वर्षांपासून सुरू राहिला.
दरम्यान सदर बँकेने तत्काळ कारवाई करून ग्राहकांच्या पैशांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले. पुढील चौकशी होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
