Headlines
Home » क्रीडा » आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेकरीता मू.जे. महाविद्यालयाच्या आयुष गुजराथीची निवड

आंतर विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेकरीता मू.जे. महाविद्यालयाच्या आयुष गुजराथीची निवड

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आय.ई.एस. विद्यापीठ भोपाल येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ बुद्दीबळ स्पर्धेकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाची निवड करण्यात आली असून या संघात मू.जे. महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडू आयुष गुजराथी याची विद्यापीठ संघात निवड करण्यात आली.

या प्रसंगी निवड झालेल्या विद्यार्थ्याचे के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन. भारंबे, मू.जे. महाविद्यालय जिमखाना विभागाचे चेअरमन प्रा.डॉ. चेतन महाजन तसेच जिमखाना विभागाचे सदस्य प्रा.डॉ. जुगलकिशोर दुबे, साधू तागड यांनी अभिनंदन केले.

खेळाडू विद्यार्थ्याला मू.जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक तसेच मू.जे. जिमखाना विभागाचे सचिव प्रा.डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!