Home » Archives for SANDIP RANDHE

SANDIP RANDHE

के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.या प्रसंगी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा.गणेश पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. कल्पेश महाजन या प्रमुख मान्यवरांच्या…

Read More

मेट्रो, ई-बसनंतर शहरी वाहतुकीसाठी ई-ट्रांझिटवर शासनाचा विचार !

पुणे ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे पिंपरी चिंचवड शहरात प्रायोगिक तत्त्वावर ई-ट्रांझिट सुरू करण्यासंदर्भात HESS-AG कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. शहरी वाहतुकीसाठी ई-ट्रांझिट हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो त्यामुळे या प्रकल्पाच्या आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यतेचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री…

Read More

लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक बहुमताने मंजूर !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : भारतीय संसदेच्या लोकसभेत आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. बहुचर्चित वक्फ संशोधन विधेयक २०२५ अखेर मंजूर झाले आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चा आणि मतदान प्रक्रियेनंतर हे विधेयक लोकसभेत बहुमताने पारित झाले. सदर विधेयकाच्या बाजूने २८८ मते, तर विरोधात २३२ मते पडली. आता हे विधेयक आज, ३ एप्रिल २०२५…

Read More

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांची आधार पडताळणी आवश्यक

धुळे ( वास्तव पोस्ट ) : कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या प्रशिक्षणार्थींना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते. आता कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या १० मार्च, २०२५ च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ ६…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्फत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने समता पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे. हा उपक्रम ०१ एप्रिल २०२५ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत ‘समता पंधरवडा’ म्हणून राबविण्यात येत आहे. समता पंधरवडा अंतर्गत, सन…

Read More

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागल्याने दुखापत

वरणगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील जवान नायक अर्जुन लक्ष्मण बावस्कर यांना आसाम – अरुणाचल सीमेवर देशाचे रक्षण करत असताना वीरमरण आले. भारत मातेचे या वीर सुपुत्रावर आज वरणगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मंत्री गिरीश महाजन हे अंत्यसंस्कारास उपस्थित होते. शहीद जवानाचे पार्थिव शरीर एका ट्रकवर ठेवलेले होते. यावेळी…

Read More

आमिर खान याने घेतली संतोष देशमुख कुटुंबियांची भेट !

बीड ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांनी धनंजय देशमुख आणि कुटुंबीयांची भेट घेतली. आता अभिनेता आमिर खान याने धनंजय देशमुख यांची भेट घेतली. पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आमिरने धनंजय यांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज…

Read More

खासदारांच्या वेतन, पेंशन आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ जाहीर !

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना आता अधिक आर्थिक लाभ मिळणार असून, माजी खासदारांचे पेन्शनही वाढवण्यात आले आहे. ही वेतनवाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू असल्याने खासदारांना आणि माजी खासदारांना थकबाकीसह वाढीव रक्कम मिळणार आहे. याबाबतची अधिसूचना २४ मार्च २०२५ रोजी जारी करण्यात आली. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार…

Read More

जळगाव पोलीस दलाची शांतता समिती बैठक संपन्न

सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, भुसावळ उपविभागीय पोलीस…

Read More

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मीनल करणवाल यांनी स्विकारला पदभार

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. करणवाल यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा…

Read More

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे ९ महिन्यांनी अंतराळातून पृथ्वीवर यशस्वी लँडिंग

Sunita Williams Returns : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि इतर दोन सहकाऱ्यांसह, बुधवारी फ्लोरिडातील समुद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरली. चारही अंतराळवीरांना कॅप्सूलमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येऊन वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. फ्लोरिडा ( वास्तव पोस्ट ) : भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स सुमारे ९ महिने १४ दिवस अंतराळात राहिल्यानंतर आज बुधवार रोजी भल्या पहाटे तिचा…

Read More

‘जो कोणी जातीबद्दल बोलेल, मी त्याला जोरदार लाथ मारेन’ : नितीन गडकरी

नागपूर (वास्तव पोस्ट ) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीच्या राजकारणाविरुद्ध मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, जात, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव केला जाऊ नये. शनिवारी नागपूर येथील सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये आयोजित दीक्षांत समारंभात भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने भाषण केले. यावेळी तो म्हणाला, “जो कोणी जातीबद्दल…

Read More

बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा होणार विस्तार !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ‘८९व्या’ बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. ३२.४६० किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाय तसेच बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी…

Read More

आशिष विशाळ हा आपलाच सहकारी : आमदार सुरेश धस

बीड ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. यावेळी आशिष विशाळ हे नाव चर्चेत आले होते. या व्यक्तीने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करायची असल्याचे सांगून अनेक अधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता. त्यामुळे मराठा कार्यकर्त्यांनी त्याला बेदम चोप…

Read More

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन १७ मार्च रोजी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. या दृष्टीने महिलांच्या…

Read More
error: Content is protected !!