Headlines
Home » क्रीडा » जळगाव जिल्हा महसूल विभाग कार्यालयाच्या अथेलेटिक्स स्पर्धा संपन्न

जळगाव जिल्हा महसूल विभाग कार्यालयाच्या अथेलेटिक्स स्पर्धा संपन्न

जळगाव दि .२७ ( प्रतिनिधी )- जिल्हा महसूल विभागाच्या अथेलेटिक्स स्पर्धा आज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे उत्साहात संपन्न झाल्या स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, रिले, जलद चालणे , गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांबउडी, उंचउडी या क्रीडा प्रकारचा समावेश होता स्पर्धा पुरुष व महिला वयोगटात घेण्यात आली यातील विजयी स्पर्धकांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात येईल.
जळगाव जिल्हा अथेलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव यांचे मार्गदर्शनात स्पर्धेत पंच म्हणून प्रा.हरीश शेळके, रविंद्र मोरे, संजय मोती, विजय विसपुते, धीरज जावळे, अजय काशीद, जितेंद्र शिंदे, रोहित सपकाळे,मनोज वाघ यांनी काम पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!