Headlines
Home » आरोग्य » तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पाचोरा येथे ‘आशा डे ‘ उत्साहात साजरा

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पाचोरा येथे ‘आशा डे ‘ उत्साहात साजरा

पाचोरा | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आज दिनांक २१ मार्च रोजी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पाचोरा मार्फत ‘आशा डे‘ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ.भूषण अहिरे, डॉ. स्नेहल शेलार (प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी ), मंगेश देवरे (मुख्याधिकारी न. पा.पाचोरा), कुंभार (नायब तहसीलदार), सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. स्वप्निल पाटील व डॉ. ग्रिष्मा पाटील, जीजा राठोड (प्रभारी एकात्मिक बालविकास अधिकारी), समाधान पाटील (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पाचोरा) उपस्थित होते.

यावेळी सुरुवातीला धन्वंतरी पूजनानंतर, मंगला पाटील व वंदना बडगुजर यांनी स्वागतगीत सादर केले. तालुका वैद्यकीय अधिकारी पाचोरा डॉ. डी.के. लांडे यांनी प्रास्ताविकात आशा स्वयंसेविका यांच्यामुळे राज्यातील माता मृत्यू, अर्भक मृत्यूत घट झालेली असून त्यांनी संस्थात्मक प्रसूतीत अजून वाढ घडवून आणण्याचे आवाहन केले. सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या बालरोगतज्ञ डॉ ग्रिष्मा पाटील यांनी या कार्यक्रमात आशा स्वयंसेविकांना लहान मुलांच्या आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले व आशा स्वयंसेविका यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनीषा कोळी, भागीरथी पाटील, रोहिणी वाघ या आशा स्वयंसेविका व मीनाक्षी पाटील (गटप्रवर्तक) यांनी मनोगत व्यक्त केली. शीला उबाळे, संगीता धनगर , रत्ना बोरसे, अनिता सोनवणे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

यावेळी सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून रंजना गुलाब पाटील (प्रथम क्रमांक), मनीषा गोविंदा वाणी (द्वितीय क्रमांक), सुरेखा नरेश चौधरी( तृतीय क्रमांक), कल्पना मनोज पाटील (शहरी भाग प्रथम क्रमांक) यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शासकीय संस्थेत सर्वात जास्त प्रसूती करणाऱ्या रंजना पाटील (प्रथम क्रमांक), शोभा पाटील (द्वितीय क्रमांक), शाहीन सय्यद (तृतीय क्रमांक), तसेच कुटुंब कल्याण कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट काम करण्याऱ्या आशा स्वयंसेविका रंजना पाटील व वंदना संत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मनीषा वाणी (प्रथम क्रमांक ), वृषाली येवले (द्वितीय क्रमांक), संगीता पाटील व रेखा पाटील (उत्तेजनार्थ) पारितोषिक देण्यात आले. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका पुष्पलता मनोज कुमावत, साधना विजयसिंह पाटील, उज्ज्वला नेताजी पाटील, निर्मला प्रकाश पाटील, भिकुबाई भीमराव पाटील, रेखा गणेश पवार यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ.स्वप्निल पाटील यांचे मार्फत उत्कृष्ट कामाबद्दल आशा स्वयंसेविका यांना आकर्षक बक्षीस वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी हरी शिरसाठ (तालुका समूह संघटक), जगन पाटील, प्रल्हाद दामोदरे, हर्षल पाठक, विजय सभादिंडे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!