जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड.प्रमोद पाटील होते. तर प्रमुख पाहुणे शाळेच्या माजी ग्रंथपाल अलका गोपाळ नेहेते उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. त्यानंतर मार्च २०२४ च्या एस.एस.सी. शालांत परीक्षेत शाळेतून प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा तसेच प्रत्येक विषयात प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी इयत्ता पाचवी, सहावी सातवी आणि आठवी आणि नववीच्या वर्गांमधून प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रास्ताविक शाळेचे पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांनी केले. आभार पूनम कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग राणे यांनी केले. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी वर्षा चौधरी, मनीषा जयकर, सुचेता बावस्कर, एस.एच. बावस्कर, संदेश कराळकर, डी.ए. पाटील, अनिल शिंदे, तुषार सोनवणे शुभम तायडे यांनी परिश्रम घेतले