Headlines
Home » सामाजिक » जळगाव येथे संत गाडगेबाबा जयंती उत्सव आयोजना निमित्त सर्व समाज समावेशक सभा संपन्न.

जळगाव येथे संत गाडगेबाबा जयंती उत्सव आयोजना निमित्त सर्व समाज समावेशक सभा संपन्न.

जळगाव ( प्रतिनिधी ) दि . २८, निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती २३ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे . जळगाव येथे यावर्षी सर्व समाज समावेशक गाडगेबाबा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे . यात संत गाडगेबाबा यांच्या नावाने विविध कार्यरत सामाजिक संस्था व संघटना तसेच त्यांच्या विचाराने प्रेरीत झालेल्या लोकांचा समावेश अत्यावश्यक आहे . सामाजिक संस्था व संघटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी विविध उपक्रमांद्वारे सर्वांनी एकत्रीत येऊन जयंती साजरी करावयाची आहे .

संत गाडगेबाबा सार्वजनिक जयंती उत्सवाचे आयोजन करण्यासाठी सर्व समाज समावेशक आढावा बैठक आज दि.२८ रविवार रोजी दुपारी ४ वाजता संत गाडगेबाबा उद्यान जळगाव येथे जळगाव जिल्हा परिट धोबी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .

या बैठकीत गाडगेबाबा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला . यात प्रत्येक सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले विचार व्यक्त केले. थोर संताची जयंती उत्सव साजरा करणे हे आपले कर्तव्य असुन आयोजनाकरीता सर्वांचे अनमोल सहकार्य आवश्यक आहे , असे आवाहन अध्यक्ष अरुण शिरसाळे यांनी केले .

पुढील आढावा सभा ३ फेब्रुवारी शनिवार रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेस विविध समाज संस्थेचे पदाधिकारी व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!