पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा बांभोरी येथे ग्रामस्थांकडून सत्कार
धरणगाव ( वास्तव पोस्ट ) : बांभोरी “आज तुम्ही जो सत्कार केला तो केवळ एक सन्मान नसून तुमच्या प्रेमाची व विश्वासाची पोचपावती आहे. हा विश्वास आणि तुमचं प्रेम हेच माझं खरं पाठबळ आहे, हीच माझी खरी श्रीमंती आहे. ग्रामपंचायत कार्यालय मंजूर केले असून त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात येणार असून गावाच्या विकासात कुठलीही कमतरता भासू देणार नाही. तुमच्या प्रत्येक अडचणीला मी माझी अडचण समजतो आणि म्हणूनच गावाच्या प्रत्येक गरजेसाठी मी कायम तुमच्या पाठीशी उभा असून गाव विकासासाठी सदैव तुमच्या सोबत आहे,” असे भावनिक प्रतिपादन पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते बांभोरी प्रचार येथे झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यात व रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. ग्रामस्थांनी या दोन्ही नेत्यांवर फुलांचा वर्षाव करत त्यांचा जंगी नागरी सत्कार केला.
बस स्थानकापासून ते गावातील मुख्य चौकापर्यंत ३५ लक्ष निधीतून रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कामाचा गौरव करत म्हणाले की, “गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील विकासाची गती अधिक वेगाने वाढत असून, राज्यात खेडोपाडी पाणी पुरवठा योजना पोहचविण्याचे पुण्य कर्म करीत आहेत. बांभोरी वासियांनी शिक्षणाला जास्त महत्व देवून आपल्या पाल्यांचे हित जोपासावे म्हणत सत्काराबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे आभार देखील मानले.
नागरी सत्कार
यावेळी ग्रामपंचायत, एकलव्य सेना, लाडक्या बहिणी, महर्षी वाल्मीक ऋषी रिक्षा सेना, महायुतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांतर्फे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील व चोपड्याचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचा शाल, श्रीफळ, वजनात गुलाबांच्या फुलांच्या हार घालून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक रवींद्र सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक माजी सरपंच ईश्वर नन्नवरे यांनी केले तर आभार शिवसेनेचे अनिल नन्नवरे यांनी मानले.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या भव्य सत्कार सोहळ्यात आयोजक अनिल नन्नवरे, सरपंच सचिन बिऱ्हाडे, उपसरपंच तुळसाबाई नन्नवरे, माजी सभापती रवी नन्नवरे, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंद नन्नवरे, माजी सरपंच ईश्वर नन्नवरे गोपाल नन्नवरे, भिकन नन्नवरे, माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तालुका संघटक देविदास कोळी, राजु पाटील, सरपंच संघटनेचे सचिन पवार, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, अमोल नन्नवरे, सुनील नन्नवरे, सोपान नन्नवरे, भाजपाचे राकेश नन्नवरे, प्रवीण नन्नवरे, निलेश नन्नवरे, ग्राम पंचायत सदस्य जगदीश नन्नवरे, संदीप कोळी, महेंद्र नन्नवरे, शांताराम नन्नवरे, ग्रामविकास अधिकारी आर.एस. देवरे, दिलीप बापू पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र सपकाळे, ऋषी साळुंखे अतुल सपकाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी परिसरातील सरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
