कजगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीस अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य एम पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक जी.टी.पाटील यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक एस.एस. केदार, एस.व्हीं. पाटील, ए.के. राजपूत, ग्रंथपाल दीपक पाटील, कनिष्ठ लिपिक कमलेश पाटील, शिपाई पी.एच. झालसे, वि.आर. देवरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
