जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित इंजिनिअररिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात पॉलिटेक्निकच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उन्हाळी अंतिम परीक्षेत घवघवीत यश मिळवले. यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कॉम्पुटर ब्रांचमधील दलाल अचल राजेश ८६.४, पाटील भाविनी ज्ञानेश्वर ८५.८८ टक्के, पाटील भावेश सतीश ८४.२४ टक्के, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर ब्रांचमधील सैंदाणे रोहित गोकुळ ९३.३८ टक्के, बाविस्कर भाग्यश्री शैलेंद्र ८९.०० टक्के, माळी मोहित प्रवीण ८८.५० टक्के, इलेक्ट्रिकल ब्रांचमधील विद्यार्थी गोविंद भगवान पाटील ८५.४१ टक्के, श्रेया नितीन पाटील ७७.७७ टक्के, रसिका गोपाळ वाणी ७६.८२ टक्के; मॅकेनिकल ब्रांचमधील विद्यार्थी पाटील हर्षल सुमेरसिंग ७५ टक्के, सोनार पारस किरण ७३.७८ टक्के, कोल्हे प्रेम ७१.३३ टक्के,
द्वितीय वर्षातील कॉम्पुटर विभागातील विद्यार्थीनी जिगीषा भारंबे ९१.६० टक्के, राधिका पाटील ९० टक्के, दिव्या बाविस्कर ८९.८७ टक्के, इलेक्ट्रिकल ब्रांचमधील विद्यार्थी मोहम्मद अबुझर शेख ८६.२७ टक्के, राधिका बडगुजर ८५.४५ टक्के, राजेश्वरी पाटील ८४ टक्के; तृतीय वर्षाचे कॉम्पुटर शाखेचे विद्यार्थी श्रेया भिकन पाटील ८९.८९ टक्के, निरंजन राजेश बोरसे ८९.४३ टक्के, विवेक पाटील ८७.७७ टक्के, इलेक्ट्रिकल शाखेचे विद्यार्थी दीपांश नेवे ८५.११ टक्के, चिन्मय चौधरी ८४ टक्के, प्रणव वाघ याने ८३.५० टक्के मिळवले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, पॉलिटेक्निक विभागाचे समन्वयक डॉ.सी.एस. पाटील, प्रा.अर्चना शेवाळे, प्रा.जगदीश पाटील, प्रा.श्रद्धा मुंदडा आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.