Home » सामाजिक » शिंदाड येथे शिवसैनिकांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !

शिंदाड येथे शिवसैनिकांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. शनिवार दिनांक १ जून रोजी सायंकाळी शिंदाड येथे अनेक पदाधिकारी, जेष्ठ शिवसैनिक यांचे सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, संपर्क प्रमुख सुनील पाटील, उपजिल्हा प्रमुख उद्धवभाऊ मराठे, नरेंद्रसिंगदादा सूर्यवंशी, युवासेना तालुका प्रमुख शशिकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माजी उपजिल्हा प्रमुख अभय पाटील, जेष्ठ शिवसैनिक हिलाल पाटील, माजी सभापती अरुण तांबे, बालू आण्णा श्रावणे, रवींद्र पाटील, अशोक सपकाळे, किशोर श्रावणे, आनंदा भाऊ चौधरी, चुडामन भोई व लक्ष्मण पाटील आदींचे वाढदिवस होते. या सर्वांचे वैशालीताई सुर्यवंशी तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.

या कार्यक्रमाला शशिकांत पाटील, अनिल कोठावदे, युवासेनेचे प्रदीप बोरसे, रवी पाटील, बालू दादा, शरीफ खाटीक, हरचंद तेली, लाला बेग, अरमान बेग, किरण पाटील आदी मान्यवरांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!