कर्जत | दि.१० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे ह्यांच्या प्रचारार्थ कर्जतमधील टिळक चौकात घेण्यात आलेल्या जाहीर सभेत युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते.
ह्यावेळी प्रत्येक राज्यात निर्माण झालेली अस्थिरता, राजकीय गोंधळ दूर करण्यासाठी आपल्याला मशाल पेटवावीच लागेल, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी नागरिकांना केलं.


सभेला शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, उपनेत्या किशोरीताई पेडणेकर, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बरगे, शिवसेनेचे रायगड संपर्कप्रमुख बबन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, आपचे रियाज पठाण, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सदस्य) गोपाळ शेळके ह्यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.
