जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे वसंत बहार हा तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात पहिल्या दिवशी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाच्या माजी ग्रंथपाल अलका नेहते व कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा.अँड. प्रमोद पाटील पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष सोनल ढाके व सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध शालेय व आंतरशालेय तसेच जिल्हास्तरीय, विभागीय व राज्य, राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांकडून गुणगौरव करण्यात आला.
महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना चव्हाण (शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव), अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहसचिव ॲड.प्रविणचंद्र जंगले, शशिकांत वडोदकर प्रशासकीय अधिकारी व सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक, किलबिल शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे, गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी आदर्श विद्यार्थी दामोदर धनंजय चौधरी व आदर्श विद्यार्थ्यीनी सृष्टी विशाल कुलकर्णी यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अर्णव पाटील या विद्यार्थ्यांने स्पर्धा परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल गौरविण्यात आले. शिक्षक महेंद्र नेमाडे, निर्मल चतुर, मनिषा जयकर यांनी विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच परिमल २०२४ या हस्तलिखिताचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
गर्जा महाराष्ट्र माझा या हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रदर्शनात महाराष्ट्रातील किल्ले प्रतिकृती मांडण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात जोगवा, जागरण गोंधळ, धनगर नृत्य, कोळीनृत्य, कोकणी बाल्या नृत्य, शेतकरी नृत्य, पोवाडा, आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
■ आनंद मेळा
शालेय विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान व श्रमाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्याहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले खाद्यपदार्थ विक्री करून सहभाग नोंदविण्यात आला. यावेळी काही मनोरंजक खेळ आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास सूत्र संचालन निर्मल चतुर, मनिषा जयकर, पुनम कोल्हे, पराग राणे, चंद्रकांत कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.