प्रतापगड ( वास्तव पोस्ट ) : राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील १२ वर्षांची मुलगी तिच्या गोलंदाजीच्या ॲक्शनमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणारा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने या मुलीचा व्हिडीओ एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केला होता, तेव्हापासून सुशीला मीना नामक चिमुकलीचे नशीब पालटले आहे.
सचिन तेंडुलकरही सुशीला मीनाची बॉलिंग ॲक्शन पाहून प्रभावित झाला. त्याने सुशीलाच्या गोलंदाजी ॲक्शनची तुलना थेट प्रसिद्ध वेगवान गोलंदाज झहीर खान याच्याशी केली आहे. सचिनने पोस्ट केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. यानंतर राजस्थानच्या भजनलाल सरकारमधील मंत्री किरोडी लाल मीना यांनीही सुशीला हिचे कौतुक करून सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. तसेच सुशीलाच्या शिक्षिकेच्या फोनवर त्यांनी व्हिडिओ कॉलही केला आणि सुशीलाशी बोलले.
सुशीला तिच्या बॉलिंग ॲक्शनमुळे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाली आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची बॉलिंग ॲक्शन पाहिल्यावर तोही थक्क झाला. यावर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सुशीलाचा व्हिडिओ शेअर करताना सचिनने लिहिले होते, की ही सहज आणि सुंदर गोलंदाजी पाहून मला झहीर खानची आठवण झाली. चेंडू रीलीज करण्यापूर्वी सुशीला मीना ज्या शैलीत उडी घेत आहे ती महान वेगवान गोलंदाज झहीर खानशी मिळतेजुळते आहे. सचिनने आपल्या पोस्टमध्ये झहीर खानला टॅग केले आहे.
भारताच्या सर्वकालीन महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या झहीर खान याने या पोस्टला उत्तर दिले आणि लिहिले, ‘तुम्ही अगदी बरोबर आहात. या मुलीची गोलंदाजी अॅक्शन अतिशय प्रभावी आहे. ती आधीच खूप प्रतिभावान दिसत आहे.
व्हायरल गर्ल सुशीला मीना कोण आहे ?
सुशीला मीना ही राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यातील धारियावाड तहसीलमधील रामेर तालब येथील रहिवासी आहेत. ती केवळ १२ वर्षांची आहे. तिच्या बॉलिंग ॲक्शनमुळे ती खूप चर्चेत आहे. सुशीलाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. पण तिला क्रिकेटची प्रचंड आवड आहे. ती वेगवान गोलंदाजी करते. सुशीलाचे आई-वडील मोलमजुरी आणि शेती करून आपला उदरनिर्वाह करतात.