जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील कान्ह ललित कला केंद्राच्या नृत्य कला विभागाच्या वतीने आषाढी एकदाशी निमित्त विठ्ठल भक्ती वर आधारित व्हिडिओ रेकॉर्डिंग नृत्यविष्कार कार्यक्रम रंगला.

या चित्रीत करण्यात आलेल्या या व्हिडिओला व कार्यक्रमास समाज माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या नृत्यांचे निर्मिता प्रमुख शशिकांत वडोदकर आहेत. नृत्यांचे दिग्दर्शन कान्ह ललित कला केंद्राचे नृत्य विभाग प्रमुख अजय शिंदे यांनी केले. व्हीडिओ एडिटिंग समन्वयक प्रा. प्रसाद देसाई यांनी केले. करिष्मा सरोदे, पूजा बडगुजर, ज्ञानदा कडू वैभवी ठाकरे यांचा त्यात सहभाग आहे.
