जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर या शाळेत जागतिक योगा दिन साजरा करण्यात आला. बालगोपालांनी शिक्षकासोबत योगा प्रात्यक्षिक केले. मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांनी योग साधने बद्दल माहिती सांगितली. योगामुळे मुलांची शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, असेही सांगण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.