कजगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) दिपक अमृतकर – कजगाव येथे रमजान ईद उत्सवात साजरी करण्यात आली. रमजान ईद हा मुस्लिम समाजाचा एक महत्त्वाचा सण आहे. एका महिन्याचे उपवास ( रोजे ) पूर्ण करून मुस्लिम बांधव हे रमजान ईद आनंदाने व उत्सवाने साजरी करत असतात. ईद निमित्त हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन पाहायला मिळाले. मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा करून सर्व समाज बांधवांच्या सुख समृद्धीसाठी दुवा पठण केले. यावेळी कजगाव ग्रामपंचायतच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. भडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे, नरेंद्र विसपुते, यांनी देखील सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या व बाजार पेठ चौकात पोलीसांनी बंदोबस्त बजावला.
