Headlines
Home » क्राईम » एमआयडीसी पोलीसांनी आरोपींकडुन ६ मोटार सायकली केल्या जप्त

एमआयडीसी पोलीसांनी आरोपींकडुन ६ मोटार सायकली केल्या जप्त

जळगाव | दि.२१ ( वास्तव पोस्ट न्यूज )– एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतुन वेगवेगळ्या कंपनीच्या ६ मोटार सायकली चोरी केल्या आहेत, अशी बातमी खंडवा येथुन एमआयडीसी पोलिस स्टेशन जळगाव यांना मिळाली होती. त्यानुसार एक पथक तयार करुन सदर आरोपींना खंडवा कारागृहातुन ताब्यात घेवुन त्यांना मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली.

पिपलोद पोस्टे जिल्हा खंडवा मध्यप्रदेश येथे आरोपी अनोप धनर्सिंग कलम (कोरकु) वय १८, राहणार सुकवी थाना, खालवा, जिल्हा खंडवा मध्यप्रदेश, आणि अंकीत सुकलाल ठाकुर, (कोरकु), वय २२, राहणार अरविंद नगर, मुसाखेडी इंन्दौर, मध्यप्रदेश, यांनी पोलिस स्टेशन हद्दीतुन ०६ मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली असुन आरोपींवर भादवी कलमां नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आरोपींकडुन जप्त करण्यात आलेल्या मोटार सायकलीमध्ये
हीरो होंडा स्प्लेंडर : एमएच १९ इइ १६४८
बजाज पल्सर : एमपी १२ एम वाय ९२४७
होंडा ड्रीम युगा : एमएच १९ बी वाय ९४६२
होंडा युनीकॉर्न : एमएच १९ सीक्यु ४९३१
ड्रीम युगा : एमएच १९ इ डी ५६३४
होन्डा शाईन एमपी १० एम यु ५७८४
अशा एकुण १,८५,००० रुपये किंमतीच्या ६ मोटार सायकली आहेत.

सदर कारवाई ही पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी सो, मा. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत सो, मा. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, दत्तात्रय पोटे, सफौ. अतुल वंजारी, पोहेका गणेश शिरसाळे, गफुर तडवी, पोना सुनील सोनार, विकास सातदीवे, योगेश बारी, पोका छगन तायडे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!