जळगाव ( वास्तव पोस्ट ) : पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढाणारी पत्रकारांची संघटना म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाची ओळख आहे. जळगाव जिल्हा पत्रकार संघटनेची वाढ व्हावी या हेतूने सामाजिक कार्यकर्ते निर्भीड पत्रकार समाधान पाटील यांची जळगाव जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. त्या आशयाचे नियुक्ती पत्र युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी दिले आहे.
युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या कोणत्याही पत्रकारावर अन्याय अत्याचार झाल्यास महाराष्ट्रभर असलेली संघटना त्याच्या पाठीशी उभी राहिल व पत्रकारांना न्याय मिळवून देईल म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाची एक वेगळी प्रतिमा तयार होत आहे. जळगाव जिल्हा तसेंच उत्तर महाराष्ट्र विभागीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची वाढ व्हावी या हेतूने सामाजिक कार्यकर्ते निर्भीड पत्रकार समाधान पाटील यांची जळगाव जिल्हा सचिव पदी नियुक्ती करून त्यांना बळकटी देण्याचे आवाहन युवा ग्रामीण पत्रकार संघाचे चे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यानी केले. जळगाव जिल्हामध्ये एक आश्वासक चेहरा मिळाला म्हणून समाधान पाटील यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या,
नियुक्ती झाल्यानंतर पत्रकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे समाधान पाटील म्हणाले, समाधान पाटील यांच्या नियुक्तीने सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातुन उत्तर महाराष्ट्र विभागीय व जिल्हामध्ये शुभेच्छाचा वर्षाव होत आहे, युवा निर्भीड पत्रकारानी राष्ट्रीय ग्रामीण पत्रकार संघात सामील होऊन संघटनेला पाठिंबा द्यावा असेही आवाहन समाधान पाटील यांनी केले आहे.
