Headlines
Home » जळगाव » मानव सेवा विद्यालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

मानव सेवा विद्यालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : मानव सेवा विद्यालयात आज दि. ८ मार्च शनिवार रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

महिला दिनानिमित्त इयत्ता १ ली ते ९ वी च्या वर्गातील विद्यार्थिनींनी कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषा साकारुन आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्यास उजाळा दिला. यात पूर्वी पाटील व भूमिका पाटील –जिजामाता, प्रतीक्षा बाविस्कर व काव्या पाटील –झाशीची राणी, उत्कर्षा सोनार व सोनाक्षी बोरसे –अहिल्याबाई होळकर, योगेश्वरी पवार व मोहिनी चौधरी –बहिणाबाई चौधरी, मानसी धनगर व साक्षी वानखेडे –प्रतिभाताई पाटील, विद्या निकुंभ व डिंपल नन्नवरे –सावित्रीबाई फुले, किरण बेदी व अजब्दी पाटील –ताराराणी, साक्षी पाटील व साक्षी वानखेडे –लता मंगेशकर, तसेच यामिनी साळुंखे –मदर तेरेसा यांच्या वेशभूषा साकारल्यात.

सदर कार्यक्रमात दर्शना ठाकूर या विद्यार्थीनीने  वकृत्व सादर केले तर योगिनी राठोड इयत्ता ९ वी च्या विद्यार्थीनीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंगावर नाटिका सादर केली. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त इयत्ता ८ वी ते इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांची परिसरात रॅली देखील काढण्यात आली.

मनिषा तायडे व रत्ना चोपडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तर सुनील दाभाडे यांनी कर्तृत्ववान महिलांवर सुरेल गीत सादर केले. या प्रसंगी मुख्याध्यापिकांनीही विद्यार्थ्यांना महिला दिनानिमित्त मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश जाधव तर आभार मनोज बावस्कर यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

One thought on “मानव सेवा विद्यालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!